Spruha Joshi| मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या अभिनयासह तिच्या कवितांसाठी देखील ओळखली जाते. स्पृहाने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता तिने बॉलीवूड अभिनेत्यासोबत देखील काम केले आहे. ‘रणनीती’ सीरिजमध्ये स्पृहा पाहायला मिळत आहे.
नुकतेच स्पृहाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ‘जिओ सिनेमावर रिलीज झालेल्या ‘रणनीती’ वेबसीरीजमध्ये साकारलेल्या छोट्याशा भूमिकेकरिता मला मिळालेले प्रेम आणि कौतुकाबद्दल मी सदैव ऋणी आहे. जिओ सिनेमावर रिलीज झालेल्या ‘रणनीती’ वेबसीरीजमध्ये साकारलेल्या छोट्याशा भूमिकेकरिता मला मिळालेले प्रेम आणि कौतुकाबद्दल मी सदैव ऋणी आहे,’ असे लिहिले आहे. याशिवाय तिने जिम्मी शेरगिलसोबत फोटो शेअर केला आहे. याशिवाय त्याच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
‘रणनीती’ सीरिजची कथा बालाकोट एअरस्ट्राइकवर आधारित आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालकोट सर्जिकल स्ट्राइक करत चोख उत्तर दिलं होतं. या वेबसीरीजमध्ये लारा दत्त, जिमी शेरगिल, आशिष विद्यार्थी, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही वेबसीरीज 25 एप्रिलला ‘जियो सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. ‘रणनीती : बालाकोट अँड बीयॉन्ड’ या वेब सीरिजमध्ये जिमी शेरगिल रॉ एजेन्टच्या भूमिकेत आहे.