मुंबई – शिंदे गट हा एक फुटीर गट असल्याने पक्षाची कार्यकारिणी कशी बरखास्त करू शकतो. तसेच ते स्वतःची कार्यकारिणी कशी जाहीर करू शकतात, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारिणीवर आक्षेप घेतला आहे. तसेच आमदार पुन्हा फुटतील या भीतीतून घाई-घाईने ही कार्यकारिणी जाहीर केली असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.
संजय राऊत म्हणाले, राज्यात सध्या “कॉमेडी एक्स्प्रेस-2′ कार्यक्रम सुरू आहे. पहिला कार्यक्रम आपण गुवाहाटीत पाहिला. आता पार्ट टू आला आहे. त्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्याची धडपड सुरू आहे. मात्र, जे शिवसेना सोडून गेले आहेत त्यांच्याशिवाय शिवसेना भक्कम उभी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारिणीने शिवसेना उभी केली.
शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही. काही आमदारांनी फुटून जाऊन गट स्थापन केला असेल, पण त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार नाही. आमदार सांभाळण्यासाठी शिंदे गटाची धडपड सुरू आहे. शिवसेना हा मूळ पक्ष, त्यामुळे इतरांना अधिकार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच पक्षातून एक गट कसा काय कार्यकारिणी जाहीर करू शकतो, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेने आणखी दोन बड्या नेत्याची केली पक्षातून “हकालपट्टी”
तसेच लोक नोकऱ्या बदलतात, मालक बदलतात तसं या लोकांनी मालक बदलले. आम्ही अजूनही सौम्यपणे जात आहोत. कायदेशीर लढाईत आमचा वेळ जात आहे. पण उद्धव ठाकरे आता राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यानंतर जे तुफान निर्माण होईल त्यापुढे कोणीही टीकणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
केजरीवाल म्हणाले… “सिंगापूर दौऱ्याला परवानगी नाकारण्यामागे केवळ राजकारण”