नवी दिल्ली – राष्ट्रपती निवडणुकीतील मतदानास आठ खासदार मुकले. त्यामध्ये अभिनेते सनी देओल आणि माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे या भाजपच्या दोन खासदारांचा समावेश आहे. वैद्यकीय उपचारासाठी सध्या देओल परदेशी आहेत. तर, धोत्रे यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
गजानन किर्तीकर आणि हेमंत गोडसे हे शिवसेनेचे दोन खासदार मतदानापासून वंचित राहिले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मतदान केले नाही. तर, तुरूंगात असल्याने बसपचे अतुल सिंह मतदान करू शकले नाहीत. त्याशिवाय, कॉंग्रेस आणि सपच्या प्रत्येकी एक खासदाराने मतदान केले नाही.