केजरीवाल म्हणाले… “सिंगापूर दौऱ्याला परवानगी नाकारण्यामागे केवळ राजकारण”

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिंगापूर दौऱ्याला परवानगी देण्यासाठी होत असलेल्या विलंबाबद्दल केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्ती केली. जर एक सामान्य नागरिक स्वतंत्रपणे परदेशात जाऊ शकतो तर मला परवानगी का नाकारली जाते आहे. एका लोकनियुक्त मुख्यमंत्र्याला अशी परवानगी नाकारण्यामागे केवळ राजकारण आहे, अन्य कोणतेच कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यापासून असाही परदेशात कमी वेळा गेलो आहे. एक किंवा दोनच वेळा गेलो असेल. देशाच्या प्रगतीची चर्चा होत असेल, देशाचे नाव मोठे होत असेल, सगळे जग आपल्याबाबत बोलत असेल तर मला वाटते आपण पक्षीय राजकारण सोडून देशाबद्दल एकत्रितपणे बोलले पाहिजे. आपल्या दिल्ली मॉडेलबद्दल जगाला जिज्ञासा आहे.
शिवसेनेने आणखी दोन बड्या नेत्याची केली पक्षातून “हकालपट्टी”
हे आमंत्रण मिळणे ही देशासाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. जगातल्या अनेक बड्या देशांच्या नेत्यांसमोर हे मॉडेल सादर करण्याची संधी आणि आमंत्रण मला मिळाले आहे. मात्र, तसे न करू देता एखाद्या मुख्यमंत्र्याला कोणत्या मंचावर जाण्यापासून रोखणे हे मला वाटते देशाच्या विरोधातले आहे. आपल्याला तातडीने तिथे जाण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी केजरीवालांनी पंतप्रधानांकडेही केली असून, त्यांना पत्रही लिहिले आहे.
नितीन गडकरींचा मोठा निर्णय ! पुणे जिल्ह्यातील ‘या’ दोन रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा
काय आहे प्रोटोकॉल…
“प्रोटोकॉल”नुसार, मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला अधिकृत परदेश दौऱ्यासाठी गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. मंजुरीची फाईल लेफ्टनंट गव्हर्नर कार्यालयामार्फत गृह मंत्रालयाकडे पाठवली जाते. दिल्ली सरकारच्या अनेक महत्त्वाच्या फायलींना उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मंजुरी दिलेली नाही. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिंगापूर दौऱ्याच्या फायलीचाही समावेश आहे, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.





