मुंबई – चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई तिच्या काली (काली चित्रपट विवाद) चित्रपटामुळे वादात आहेत. हिंदू समाजातील लोकांनी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात हिंदू संतही वक्तव्ये करत आहेत. यातच धर्मगुरू मिर्ची बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यां लीना मणिमेकलाईला जीवे मारण्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. स्वामी वैराग्यानंद यांना मिर्ची बाबा म्हणूनही ओळखले जाते.
काली चित्रपटाच्या पोस्टरमध्ये देवी कालीच्या हातात सिगारेट आणि एलजीबीटीचा झेंडा दाखवण्यात आला आहे. याबाबत नागरिक व संतांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, श्री पंचायती निरंजनी आखाडा, हरिद्वारचे महामंडलेश्वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज म्हणजेच मिर्ची बाबा यांनी हिंदू देवतांचा अवमान करणाऱ्या चित्रपट निर्माती लीनाला जीवे मारणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली.
मिर्ची बाबा म्हणाले,’आमच्या धर्माची बदनामी केली जात आहे. हिंदू धर्माची बदनामी मी अजिबात सहन करणार नाही. मी आज भारतात घोषणा करतो की अशी चित्रे काढणार्यांला मारून टाका. जर कोणी लीनाला मारले तर मी माझ्या आश्रमातून त्याला 20 लाख रुपये देईन,
ते पुढे म्हणाले,’आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठ्या षडयंत्राखाली आमच्या धर्माची बदनामी केली जात आहे. त्यामुळे आता हे थांबवले पाहिजे जे कोणी तिला मारेल त्याला मी पंचायती निरंजिनी आखाड्याच्या महामंडलेश्वरला २० लाख रुपये देईन.’
यापूर्वी अयोध्येतील हनुमानगढीचे महंत राजू दास यांनीही चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाईला मारण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. दरम्यान, मिर्ची बाबाच्या या वादग्रस्त विधानावरून आता वातावरण चांगलेच तापले आहे. सोशलवर या प्रकणावरून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.