मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत काही खासदारांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पॅच-अप करण्याची विनंती ठाकरे यांना केल्याचे समजते.
शिवसेनेचे दीर्घकालीन हित विचारात घेऊन शिंदे गटाशी जुळवून घेतले जावे, अशी भूमिका काही खासदारांनी मांडल्याची माहिती त्या पक्षातील सुत्रांनी दिली. त्या भूमिकेला ठाकरे यांनी काय प्रतिसाद दिला ते तातडीने समजू शकले नाही. शिवसेनेचे लोकसभेत 19 खासदार आहेत.
‘…तर आज ‘ही’ वेळ आली नसती’ – शिवसेनेचा फडणवीसांवर पुन्हा निशाणा
त्यापैकी श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि राजन विचारे हे 3 खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. श्रीकांत हे मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र आहेत. विचारे हे शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याचे प्रतिनिधित्व करतात. तर, गवळी यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे यांना पत्र पाठवून बंडखोर गटाची गाऱ्हाणी ऐकून घेण्याची मागणी केली होती.
शिवसेनेतील काही खासदार शिंदे गटाचा भाग बनू शकतात अशी चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर, ठाकरे यांनी खासदारांशी संवाद साधण्याला महत्व आहे.
ब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप,’आधी गडकरी नंतर फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण”