मुंबई – शिवसेनेशी बंड केल्यानंतर काल मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपण या मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारणार नाही असे फडणवीस यांनी याआधी सांगितले होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने आग्रह केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. यातच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यवर टीका होत आहे. तसेच विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांकडून फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.
यातच उपमुख्यमंत्री असतील हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केलं ज्यानंतर एकच खळबळ उडाली. यावर विविध चर्चा होत असतानाच ब्राह्मण महासंघाने भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण केलं जातं आहे असं म्हटलं आहे. नितीन गडकरींपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनाही डावललं गेल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे. सध्या सोशल मीडियावरही याच मुद्यावरून वाटेवरून तापले आहे.
काय आहे सोशल मीडिया पोस्ट
भाजपामध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण !
पंतप्रधान स्पर्धा मधून हटविण्यासाठी नितीन गडकरीच्या चारीत्र हननाच्या माध्यमातून खच्छीकरण केल्या नंतर गेले तिन वर्षा पासुन भाजपातील तथाकथीत नेते मंडली देवेंद्र फडणविस यांचा घोडादौड अडविण्या करीता पूर्ण बहुमतापेक्षा अधीक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा शड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतिने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले. आत्ता फडणविस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेचा दारापर्यंत पोहचविले नंतर मा.एकनाथ शिंदे यानां मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणविस यांनी मोठे मनाने मुख्यमंत्री पदाचे त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविल्या नंतर भाजपातील वरीष्ठ नेत्रत्वाने बलजबरीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी आग्रह धरून देवेंद्र फडणवीस यांच्या खच्चीकरण करण्यात आले आहे. भाजपा मध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेत्रत्वाचा खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कायस्थान चाललेला निदर्शनात येत आहे. याघटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
डॉ. गोविन्द कुलकर्णी,
अध्यक्ष
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ