यवत : जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीने हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील आपला मुक्काम संपवून सायं दौंड तालुक्यात फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बोरीभडक येथे ४ वा. ४० मि. आगमन झाले.
यावेळी संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रंजना कुल , भाजपा किसानमोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुल, पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी राहुल धस, पुरंदर-दौंडचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड , तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ, महावितरणचे राजेंद्र एडके,युवानेते गणेश थोरात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, भाजपा तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे वैशाली नागवडे, राणी शेळके, योगिनी दिवेकर यांसह तालुक्यातील पदाधिकारी , शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.