मुंबई – अक्षय कुमार पुढील वर्षी अनेक चित्रपट घेऊन येणार आहे. सध्या अभिनेता त्याचा आगामी चित्रपट ‘वेलकम टू जंगल’च्या ( Welcome to jungle ) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अक्षय या चित्रपटाबद्दल चाहत्यांना सतत अपडेट्स देत असतो. हा चित्रपट मल्टीस्टारर बिग बजेट चित्रपट असणार आहे. रवीना टंडन ते दिशा पटानी यांसारख्या अनेक दमदार नायिका देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. अलीकडेच अक्षय कुमारने ( Akshay Kumar ) या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये त्याचा अॅक्शन अवतार पाहायला मिळतोय. या व्हिडिओत त्याच्यासोबत संजय दत्तही ( Sanjay Dutt ) दिसत आहे. ‘वेलकम’ चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार घोड्यावर स्वार झाल्याचं दिसत आहे. संजय दत्त त्याच्या मागे दुचाकीवर दिसत आहे. व्हिडिओ पाहता संजय दत्त अक्षय कुमारचा पाठलाग करत असल्याचं दिसत असून तो ‘वेल टू द जंगल’च्या सेटवरील आहे. व्हिडिओ खूपच जबरदस्त आहे.
हा व्हिडिओ पोस्ट करताना अक्षय कुमारने कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिले, ‘किती सुंदर योगायोग आहे की आज आपण वेलकमला 16 वर्षे झाल्याचं सेलिब्रेट करत आहोत. या निमित्ताने मी वेलकम टू द जंगल या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग करत आहे आणि त्यात संजू बाबा देखील आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमार शेवटचा ‘मिशन रानीगंज’मध्ये दिसला होता. या वर्षी अक्षय कुमारचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये ‘सेल्फी’ आणि ‘ओह माय गॉड 2’ चा समावेश आहे. सेल्फी पडद्यावर फार काही करू शकला नाही, पण ‘OMG 2’ ला चाहत्यांचे प्रेम मिळाले.’मिशन राणीगंज’बद्दल बोलताना, या चित्रपटातील अक्षय कुमारचे काम समीक्षकांनाही आवडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.