नवी दिल्ली – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला.विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी जैन यांचा जामीन फेटाळताना जैन यांना जामीन मंजूर करण्यासाठी हा टप्पा योग्य नाही असे कारण दिले आहे.
काल जैन आणि ईडीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.जैन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जैन यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असलेली सर्व खाती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे देण्यात आली आहेत. तथापि जैन यांच्याकडे असलेले मंत्रिपद कायम ठेवण्यात आले आहे.
जैन हे निर्दोष असून त्यांना केवळ राजकीय आकसापोटी अडकवण्यात आले आहे असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.