मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आपल्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे अनेकदा ती ट्रोलही झाली आहे. तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती फोटो क्लिक करणाऱ्या चाहत्यावर चांगलीच भडकली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
मलायका अरोरा अलिकडे रोज योगा सेंटरच्या बाहेर स्पॉट होते. नुकतीच ती आणि अभिनेत्री कुब्रा सैत योगा सेंटरच्या बाहेर एकत्र दिसल्या होत्या. पण यावेळी असं काही घडलं ज्यामुळे ती चांगलीच भडकली. आणि तोच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा योगा सेंटरमधून निघून कारमध्ये बसताना दिसत आहे आणि त्याचवेळी तिचा एक चाहता तिच्यासोबत फोटो काढताना दिसत आहे.
View this post on Instagram
मलायका देखील सुरूवातील त्याला पोझ देते पण सतत ब्लर फोटो असल्याने तो पुन्हा पुन्हा फोटो काढत राहतो. ज्यामुळे मलायका वैतागलेली दिसते. या व्हिडीओमध्ये अखेर त्या चाहत्याला, “आणखी किती फोटो काढणार?” असा प्रश्न विचारताना दिसते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, मलायका चाहत्यावर नाराज झालेली दिसत आहे. पण तो चाहता तिला पुन्हा एका फोटोसाठी विनंती करतो तेव्हा ती त्याला पुन्हा पोझ देताना दिसते. त्यावेळी मागे असलेल्या कुब्रा सैतला देखील हसू आवरणं कठीण झालेलं पाहायला मिळत आहे. मलायकाचा चाहत्यासोबतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका ब्लॅक स्पगेटी आणि शॉर्टमध्ये दिसत आहे.