मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही ‘रानबाजार’ या वेब सिरीज मुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने या वेब सिरीज मध्ये बोल्ड भूमिका साकार केली आहे. त्यानंतर आता ती आगामी ‘वाय’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माध्यमांशी बोलताना प्राजक्ताने तिचे एक सिक्रेट शेअर केले आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचे ब्रेक अप झाले होते. त्याच संदर्भातला अनुभव तिने माध्यमांशी बोलताना शेअर केला आहे.
तिने माध्यमांना सांगितले की, या चित्रपटात माझी खूप छोटी पण महत्वाची भूमिका आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्या खासगी आयुष्यात खूप काही सुरू होतं. त्यावेळीच माझं ब्रेकअप झालं होतं. मी कुठे आहे, काय करतेय याची माझी मलाच कल्पना नसायची. किंबहुना शूटिंगदरम्यानच्या अनेक गोष्टी मला नीट आठवतही नाहीत. आम्ही जेव्हा चित्रपट पाहत होतो, तेव्हा मला दिग्दर्शक आठवण करून देत होते की तू हा सीन करताना पडली होती. हा सीन करताना तू अशा पद्धतीने बोललीस, तुला आठवतंय का? मी त्यांना फक्त हो असं म्हटलं होतं. पण मला त्यावेळी एकही गोष्ट आठवत नव्हती. मी माझ्याच विचारांमध्ये गुंतले होते”, असा तिच्या अनुभव तिने माध्यमांशी शेअर केला आहे.
दरम्यान ‘वाय’ या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता आणि प्राजक्ता माळीसोबत नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्याही भूमिका आहेत. येत्या 24 जून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.