Arhaan Khan | Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान एकमेकांपासून वेगळे झाले आहे. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत असून, ते दोघे सोबत आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच अरबाज खानने शोरा खानशी लग्न केले आहे. मलायका-अरबाजच्या घटस्फोटाला बरीच वर्षे उलटली असली तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य अजूनही चर्चेत आहे. या दोघांना अरहान नावाचा मुलगा देखील आहे.
दरम्यान, अश्यातच मलायका अरोरा आणि तिचा मुलगा अरहान खान चांगलेच चर्चेत आले आहे. अरहान सध्या पॉडकास्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेताना दिसतोय. अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहाननं सिनेमात न येता पॉडकास्ट शो करायचं ठरवलं होतं. । Arhaan Khan | Malaika Arora
काही दिवसांपूर्वी त्याच्या या ‘डंब बिरयानी’ या पॉडकास्टच्या लॉन्चसाठी सगळे खान कुटुंबिय एकत्र आले होते. पहिल्या भागात अरबाज खान आणि सोहेल खान सहभागी झाले होते. आता दुसऱ्या पॉडकास्टमध्ये अरहानची आई मलायका अरोरा सहभागी झाली होती.
मात्र, आता अरहानचा हा दुसरा पॉडकास्ट चांगलाच चर्चेत आलाय. या पॉडकास्टमध्ये अरहान आणि मलायका एकमेकांना वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसतायत. यामध्ये त्याने लग्न, घटस्फोट, नातेसंबंधावर भाष्य केले.
View this post on Instagram
सोशल मीडियावर मलायकाच्या एपिसोडचा टीझर आऊट झाला आहे. सध्या हा टीझर इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. शोमध्ये मलायका आणि अरहान यांनी एक गेम खेळला. यात त्यांनी एकमेकांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारले.
यावेळी मलायकाने आपला 21 वर्षीय मुलगा अरहानला त्याच्या सेक्स लाईफबद्दलही प्रश्न विचारला. मलायकाने त्याला “तू तुझी वर्जिनिटी कधी गमावली असे थेट विचारले…. चक्क आईनेच असा प्रश्न केल्याने अरहानला आश्चर्याचा धक्का बसला.
त्यावर मलायकाने मला प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर दे असे म्हटले. तर, अरहानने देखील तू लग्न कधी करणार आहेस’, असा प्रश्न केला आहे. आई आणि मुलामधील हा संवाद पाहून नेटकरी चांगलेच भडकले असून, अरहानच्या या पॉडकास्ट व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स आल्या आहेत.
आपल्या तरुण मुलाच्या सेक्स लाईफवर असा प्रश्न विचारणे चुकीचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. तर, एका युजरने हे आपली भारतीय संस्कृती उद्धवस्त करत असल्याचे म्हटले. तर हे कसले संस्कार आहेत… असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. । Arhaan Khan | Malaika Arora