पुणे – संपूर्ण चौकशी केल्याशिवाय नोटरी वकिलांवर कागदपत्रांच्या संदर्भातील फसवणूकीचे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्यांकडे केली आहे.
त्यावेळी प्रदेशाध्यक्ष ऍड. सय्यद सिकंदर अली, प्रदेश कार्याध्यक्ष ऍड. यशवंत खराडे, पिंपरी, चिंचवड शहर, खेड आणि मावळ तालुका अध्यक्ष ऍड. अतिश लांडगे, ऍड. शरद शेळके आदी उपस्थित होते. दरम्यान परिपत्रक काढून याबाबत सर्व विभागांमध्ये कळवितो, असे आश्वासन लोहिया यांनी दिल्याचे ऍड. लांडगे यांनी सांगितले.
नोटरी वकील विधी आणि न्याय विभागाच्या नोटरी सेलच्या नियमानुसार प्रतिज्ञापत्रे, करारनामा आणि इतर कागदपत्रांची नोटरी करत असतात. नोटरी करताना त्यांचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नसतो. मात्र, काही ठिकाणी कागदपत्रांची शहानिशा न करता पोलिसांनी नोटरींवर फसवणूकीचे गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर या मागणीचे पत्र लोहिया यांना देण्यात आले आहे.