मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी आजपर्यंत सोशल मीडियावर तिच्या भडक विधानांमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. एका मुलाखतीत अनन्या पांडे म्हणाली होती की, स्टार किड्सनाही इंडस्ट्रीत संघर्ष करावा लागतो. या विधानानंतर तिला सोशलवर चांगलेच ट्रोल करण्यात आले. मात्र आज अनन्या पांडेने बॉलीवूड इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले आहे. ती एक एक करून करिअरची शिडी चढत आहे.
अनन्या पांडेने सांगितलं किस्सा
‘द रणवीर शो’मध्ये अनन्या पांडेने सांगितले की, तिला करिअरच्या सुरुवातीच्या काळात लैंगिकतेचा सामना करावा लागला आहे. हे प्रकरण एवढ्यापर्यंत पोहोचले होते की, अनन्याला ‘बूब जॉब’ करायला सांगितलं होतं. बूब जॉब म्हणजे स्तनांना परफेक्ट साइजमध्ये आणण्यास सांगितलं गेलं होतं.
“लोकांनी मला चेहरा, शरीरासह बूब जॉब घेण्याचा सल्ला दिला, जे माझ्यासाठी खूप वेदनादायक होते. मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या तोंडून या गोष्टी बाहेर पडल्या. असं अनन्या पांडे म्हणाली. ते म्हणायचे थोडे भरा, तुमचे वजन वाढले पाहिजे. सर्वात वाईट गोष्ट तेव्हा होते जेव्हा तुम्ही एखाद्याला त्याच्या शरीरावरून जज करता.” असंही तिने सांगितलं.
अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ती या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. तिच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यास अनन्या पांडे लवकरच विजय देवरकोंडासोबत ‘लिगर’मध्ये दिसणार आहे.