मोरगाव (पुणे) – मोरगाव-जेजुरी रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 29 मे) घडली. विनोद जाधव (वय 32, रा. भवानीनगर, ता. इंदापुर, जि.पुणे) असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे.
भवानीनगर येथील चार मित्र चारचाकी वाहनाने जेजुरी वरुन भवानीनगर येथे जात होते. ते चोरवाडी परीसरात आले असता लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूला थांबले होते. यावेळी विनोद याला अज्ञान दुचाकीने जोरदार धडक दिली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला उपचारासाठी मोरगाव-जेजुरी रस्त्यावरील सिद्धिविनायक हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने भवानीनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.