मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री ‘कंगना राणावत’ने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते.
कंगना सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते कंगनाने तिच्याबद्दलचा हा समज आपल्या कष्टाने सार्थ ठरवला आहे.
नुकतंच कंगनाचा ‘धाकड’ सिनेमा प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये ‘अॅक्शन, स्टाईल आणि धमाका’ हे सर्व दिसून येत आहे. या चित्रपटात कंगना ‘एजंट अग्नि’च्या भूमिकेत दिसून आली आहे.
रिलीजपूर्वी कंगनाच्या ‘धकड’ या चित्रपटाचा प्रीमियर मुंबईत ठेवण्यात आला असून, त्यात चित्रपटाची सर्व स्टारकास्ट दिसली. कंगनाचा यावेळीचा लुक सर्वाधिक चर्चेत आला आहे. कंगनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. कंगनाने तिचे फोटोशूट सोशल शेर केले आहे.
धाकड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना यापूर्वी काशीला पोहोचली होती. जिथे त्याचा पारंपरिक लूक पाहायला मिळाला. या फोटोमध्ये तिने आकर्षक पोझ देत फोटो शूट केले आहे. फॅन्सने देखील या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.