मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगम नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकताना दिसून येतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा सोनू निगम एका वादात अडकण्याची शक्यता आहे. सोनू निगमने एका मुलाखतीदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये सोनू निगमने नवरात्रीत मटण बंदी कशाला? असे वक्तव्य केले आहे. त्याने केलेल्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोनू निगमने काही दिवसांपूर्वी एका वृत्तवहिनीला मुलाखत दिली होती. याच मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनू निगमने, “नवरात्रीदरम्यान मटणाची दुकाने बंद करणे चुकीचे आहे. जो व्यक्ती मटणाची विक्री करत आहे, ते त्याचे काम आहे. त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह सुरु आहे. त्याचे दुकान तुम्ही बंद करु शकत नाही. तुम्ही म्हणता तेव्हा मी जय श्री राम म्हणायला मी काही त्यांचा भक्त नाही.” मुलाखतीदरम्यानचा म्हटले आहे. मुलाखतीमधील एवढीच क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकरी संताप व्यक्त करत आहे.
Sonu Nigam problem why meat
Ban we should sonu nigam ban#BhandSonuNigampic.twitter.com/TrMaxRp6yV— Rani Singh (@RaniSingh7459) May 18, 2022
सोनू निगमचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. ‘नवरात्रीत मटण बंदी करु नका’, ‘मी जय श्री राम म्हणायला भक्त नाही’, या विविध वक्तव्यावरुन नेटकरी त्याला सुनावताना दिसत आहेत. यापूर्वीही अनेकदा सोनू निगमने वादग्रस्त विधाने केली आहेत. यापूर्वीही २०१७ मध्ये सोनूने मशिदीवरील भोंग्याद्वारे अजानचा विरोध केला होता.
भोंग्याचा विषय चिघळल्यानंतर त्याने स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्याने “मी फक्त एका सामाजिक विषयावर माझं मत मांडलं आहे. कोणत्याही धर्माचा मी विरोध केलेला नाही. मी धर्मनिरपेक्ष आहे. हे अजान संदर्भात नाही तर भोंग्याच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या आवाजाच्या तीव्रतेसंदर्भात होतं, असे तो म्हणाला होता. मी मंदिर आणि गुरुद्वारासंदर्भातही हेच बोललो होतो. पण याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही,” असेही त्यावेळी त्याने म्हटले होते.