नवी दिल्ली – भारतीय नौदलासाठी मंगळवारचा दिवस खूप खास होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरत आणि उदयगिरी या दोन युद्धनौका मुंबईतील मजगाव डॉक येथे लॉन्च केल्या. या दोन्ही युद्धनौका मेक इन इंडिया अंतर्गत भारतात बांधल्या गेल्या आहेत.
मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल ने सांगितले की, दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका एकाच वेळी लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या युद्धनौकांची वैशिष्ट्य
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लॉन्च केलेल्या या दोन्ही युद्धनौकांना पर्वत आणि शहराची नावे देण्यात आली आहेत. दोन्ही युद्धनौकांची रचना नौदल रचना संचालनालयाने (DND) अंतर्गत केली आहे आणि MDL, मुंबई येथे बांधली आहे. सुरत हे प्रकल्प 15B वर्गाचे चौथे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आहे, तर उदयगिरी ही P17A वर्गाची दुसरी स्टेल्थ युद्धनौका आहे.
दोन्ही युद्धनौकांचं लॉचिंग करताना, राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात दोन्ही युद्धनौकांचे वर्णन ‘आत्मनिर्भर भारत’ वर विशेष लक्ष केंद्रित करून देशाची सागरी क्षमता वाढविण्याच्या सरकारच्या अतूट वचनबद्धतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून केले. संपूर्ण जग सध्या करोना महामारी आणि युक्रेन-रशिया यांच्यातील महायुद्धाचा सामना करत असल्याने या स्वदेशी युद्धनौकांचे लॉचिंग खूप महत्वाचे आहे, असल्याचं राजनाथ यांनी म्हटलं.
आयएनएस सुरत
आयएनएस सूरत हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B चे नेक्स्ट जनरेशन स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. ते 7400 टन जड आहे. त्याची लांबी 163 मीटर असेल आणि वेग ताशी 56 किलोमीटर असेल. यामध्ये चार इंटरसेप्टर बोटीसह 50 अधिकारी आणि 250 खलाशी बसू शकतात. ते सुमारे 45 दिवस समुद्रात राहू शकते.
आयएनएस उदयगिरी
आयएनएस उदयगिरी हे भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17A मधील तिसरी फ्रीगेट युद्धनौका आहे. स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका आधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. यात प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे. आयएनएस उदयगिरी ही नौदलाच्या प्रकल्पातील तिसरी फ्रिगेट युद्धनौका आहे. नौदलाच्या या प्रकल्पांतर्गत देशातच 7 फ्रिगेट्स बांधण्यात येणार आहेत.