मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. जगताप यांच्या BMW कारने एसटी बसला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. यामध्ये जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सुदैवाने या भीषण अपघातातून जगताप थोडक्यात बचावले आहेत.
आमदार जगताप यांच्या कारने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर एसटीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. हा अपघात महामार्गावरील रासायनीजवळ झाला आहे. या अपघातात आमदार थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. ते मुंबईमध्ये सुखरूप पोहोचले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतून विस्कळीत झाली होती.