मुंबई – राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
सुधारित दरवाढ पुढीलप्रमाणे आहे. दुचाकी वाहन – 50 (जुने दर 35), पेट्रोल वरील तीनचाकी वाहन -100 (जुने दर 70), पेट्रोल सीएनजी एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन -125 (जुने दर 90), डिझेलवर चालणारे वाहन-150 (जुने दर 110) हे दर तात्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायूप्रदूषण तपासणीसाठी देय राहतील.