मुंबई – बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आणि सीमा खान यांचा घटस्फोट होणार आहे. लग्नाच्या 24 वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेल खान आणि सीमा खान आज कौटुंबिक न्यायालयाबाहेर दिसले. त्यांचे फॅमिली कोर्टाबाहेरचे फोटो व्हायरल होत आहेत.
ईटाइम्स च्या वृत्तानुसार, कौटुंबिक न्यायालयातील एका सूत्राने सांगितले की, सोहेल खान आणि सीमा खान आज न्यायालयात हजर होते. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी दोघेही मित्रासारखे दिसत होते.
कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर दोघेही आपापल्या कारमधून घराकडे निघाले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
सोहेल खान आणि सीमा खान 1998 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. 2017 मध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, सोहेल आणि सीमा यांच्या विभक्त झाल्याची माहिती समोर आली होती.
‘द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमध्ये सोहेल आणि सीमा वेगळे राहतात आणि मुलं दोघांसोबत राहतात असं दाखवण्यात आलं होतं. सीमा आणि सोहेल वेगळे राहतात हे या शोमधून स्पष्ट झाले होते. मात्र आज कौटुंबिक न्यायालयाबाहेर दोघेही दिसल्याने त्यांचा घटस्फोट निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.