नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत देशात करोना संसर्गाचे 2 हजार 897 नवे रुग्ण आढळले असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णवाढीनंतर देशातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 494 झाली आहे. तर, दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.61 टक्क्यांवर गेला आहे.
#COVID19 | India reports 2,897 fresh cases, 2,986 recoveries, and 54 deaths in the last 24 hours. Total active cases 19,494. Daily positivity rate at 0.61% pic.twitter.com/0Y0kONOChv
— ANI (@ANI) May 11, 2022
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत देशभरात 2 हजार 897 करोना रुग्णांची वाढ झाली आहे. 2 हजार 986 जण करोनातून बरे झाले असून या सर्वांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.