नवी मुंबई – लैंगिक शोषण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असणारे भाजप आमदार गणेश नाईक यांना अटक होण्याची शक्यता आहे. ठाणे सत्र न्यायालायने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. दीपा चौहान नावाच्या महिलेने नाईकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
नाईक यांच्यासोबत असलेल्या संबंधातून मला मुल झाले. त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्ती केली असा आरोप संबंधित महिलेने केला असून गणेश नाईक यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.
मुलगा 5 वर्षाचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. परंतू त्यांनी तसे केले नाही व कोणतीही आर्थिक मदतही केली नाही असा आरोप महिलेने केला आहे.