मुंबई – आज, आयपीएल 2022 च्या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) विरूध्द पंजाब किंग्ज (PBKS) अशी लढत होणार आहे. दिल्लीचा संघ सध्या कोरोनाशी झुंज देत आहे. संघाचे दोन खेळाडू मिचेल मार्श आणि टिम सेफर्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचवेळी आणखी चार कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हापासून संघातील उर्वरित खेळाडूंमध्ये कोरोनाची भीती आहे.
दिल्ली कॅपिटल्स (DC) विरूध्द पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जविरुद्ध टाॅस (नाणेफेक) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals have elected to bowl against @PunjabKingsIPL.
Follow the match ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/i7EttsbTlp
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
कोरोनाबाधित मिशेल मार्शच्या जागी सर्फराज खानचा दिल्ली संघात समावेश करण्यात आला आहे. टाॅस दरम्यान पंत म्हणाला की,आमच्यासोबत दुर्दैवी घटना घडल्या आहेत, पण आमचे लक्ष त्याकडे नाही. आम्ही खेळायला तयार आहोत.
दुसरीकडे पंजाब किंग्जने दोन बदल केले आहेत. प्रभसिमरन सिंग आणि ओडियन स्मिथला वगळण्यात आले आहे. कर्णधार मयंक अग्रवाल परतला आहे. या मोसमात नॅथन एलिसला प्रथमच संधी देण्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग-11 : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (c&wk), रोवमन पॉवेल, ललित यादव, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.
पंजाब किंग्ज प्लेइंग-11 : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
दरम्यान, दिल्लीच्या संघाने पाच सामन्यांपैकी दोन विजय मिळवले आहेत आणि ते चार गुणांसह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पंजाबचा संघ सहा पैकी तीन सामने जिंकत सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये पंजाब आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. यापैकी 13 दिल्ली आणि 15 सामने पंजाबने जिंकले आहेत.