मुंबई – मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पराभवानंतर आपली निराशा व संताप लपवता आला नाही. सामना संपल्यावर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात त्याने ध्वनी तंत्रज्ञावर आगपाखड केली. अरे त्याला आवाज वाढवायला सांगा, असे रोहितने सुनावले.
बुधवारी पुण्याच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पुरस्कार सोहळ्यात समालोचक रोहितला काही प्रश्न विचारत होते त्यावेळी त्यांचा आवाज रोहितला निट ऐकू येत नव्हता. कारण पराभवाचे असले तरी निमित्त आवाजाच्या पातळीचे करत रोहितने आपला संताप व्यक्त केला. यंदाच्या स्पर्धेत अद्याप मुंबई इंडियन्सला एकही सामना जिंकता आलेला नाही. सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ नवव्या स्थानावर आहे. त्यामुळेच रोहितची चीडचीड स्पष्ट दिसत होती.