पिंपरी – राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकर भरती करण्यासाठी खासगी कंपन्यांचा सहभाग वाढला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेनेदेखील खासगी संस्थांच्या मदतीने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका गट “अ’ ते ‘क’ संवर्गातील विविध 128 पदांसाठी अर्ज मागवले आहे. आतापर्यंत महापालिकेला 19 हजार 15 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा राज्य शासनाच्या आदेशानुसार टीसीएस ही खासगी कंपनी घेणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट अ ते क संवर्गातील 128 रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून 19 हजार 15 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 200 अर्ज आले असून 13 जागा आहेत. तर स्टाफ नर्स या पदासाठी सर्वाधिक 996 अर्ज आले असून 70 जागा आहेत.
राज्य शासनाने भरतीसाठी नियुक्त केलेल्या यापूर्वीच्या कंपन्याचे पॅनेल रद्द केले आहे. यापुढे ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस, आणि एमकेसीएल
ऑफलाइन माध्यमातून होणाऱ्या भरतीमध्ये अनेकवेळा गोंधळ होत होता. त्यामुळे आता खासगी एजन्सीच्या माध्यमातून नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठी आलेल्या तीनही संस्था या नामांकित आहेत.
– राजेश पाटील, आयुक्त