नवी दिल्ली – भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) पॅरा स्पोर्टससह 21 क्रीडा प्रकारांमधील 2,509 “खेलो इंडिया’ ॲथलीट्ससाठी जानेवारी ते मार्च महिन्यांसाठी एकूण 7.22 कोटी रुपये भत्ता म्हणून जारी केले आहेत. वार्षिक खेलो इंडिया शिष्यवृत्ती योजनेनुसार मान्यताप्राप्त अकादमींमध्ये प्रत्येक निवासी खेळाडूला प्रशिक्षणासाठी 6.28 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते, अशी माहिती साईकडून देण्यात आली.
या भत्त्यांपैकी 1 लाख 20 हजार रुपये थेट ॲथलीटच्या बॅंक खात्यात हस्तांतरित केले जातात, तर उर्वरित रक्कम ॲथलीटच्या प्रशिक्षण, भोजन, राहण्याची आणि खेलो इंडिया अकादमीच्या प्रशिक्षणासाठी खर्च केली जाते.