मियामी गार्डन्स – बिगर मानांकित नाओमी ओसाकाने यशस्वीपणे पुनरागमन करत मियाअी ओपन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता विजेतेपदासाठी तिची लढत सोमवारी द्वितीय मानांकित ईगा स्विटेक हिच्याशी होणार आहे.
स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम फेरी रविवारी होणार असून कॅस्पर रुड आणि कार्लोस अल्काराज यांच्यात ही लढत होईल. कस्पर रुडने उपांत्य फेरीत फ्रान्सिस्को सेरुंडोलोचा 6-4, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.