पुणे – रायगड महाड येथे झालेल्या राष्ट्रीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वात जास्त पदकांची कमाई करत विजेतेपद प्राप्त केले. देशातून 18 राज्यांमधून 600 खेळाडूंचा सहभाग होता. 10 वर्षांखालील वयोगटात धनुष्य प्रकारामध्ये अभीर जोशीने सुवर्ण, तर आभीर टिकेकर, इरा शेख, श्लोक नाईक आणि भार्गव शिंगटेने रजतपदक प्राप्त केले.
14 वर्षे खालील वयोगटात सृष्टी जयंत सुर्वेने सुवर्ण, शर्विल रायकरने 3 रजत, नेत्रा सोलंकीने 2 सुवर्ण, अजितेश जायडे रजत, निदा सुर्यवंशी, शौर्य जगतापने ब्रॉंझपदक प्राप्त केले. 17 वर्षे खालील वयोगटात शार्विल रायकरने रजत, ईशान बोराटेने सुवर्णासह 3 पदके, तर तनिष नवरे, नेत्रा सोलंकी, पार्थ झगडेने रजत, आदिती जाधवने 2 सुवर्ण पदक प्राप्त केले. 19 वर्षे खालील वयोगटात आर्य सुहास काकडेला 2 सुवर्ण पदक व ईशान बोराटे याला 1 सुवर्ण 1 रजतपदक प्राप्त केले.