नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा(16 मार्च 2022) दिवस देशवासियांच्या लसीकरणासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. तसेच 12-14 वयोगटातील मुले आणि 60 वर्षावरील नागरिकांनी लसीची मात्रा घ्यावी, अशी विनंती देखील पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
Today is an important day in India’s efforts to vaccinate our citizens. Now onwards, youngsters in the 12-14 age group are eligible for vaccines and all those above 60 are eligible for precaution doses. I urge people in these age groups to get vaccinated.
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2022
ट्वीटरव्दारे दिलेल्या संदेशांमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की; “भारताने देशवासियांच्या लसीकरणासाठी घेतलेल्या प्रयत्नांमध्ये आजचा दिवस (16 मार्च 2022) महत्त्वपूर्ण आहे. आजपासून, 12-14 वयोगटातील मुले लसीकरणासाठी पात्र आहेत आणि 60 वर्षांवरील नागरीकांनी लसीची खबरदारीची मात्रा घ्यावी. या वयोगटातील नागरिकांना मी लसीकरणाची विनंती करतो.”
“भारताने जागतिक जबाबदारीची भूमिका निभावत लसीकरण मैत्री (Vaccine Maitri) कार्यक्रमांतर्गत अनेक देशांना लस पाठवली. भारतीय लसींमुळे जागतिक पातळीवर कोविड-19 विरोधात सशक्तपणे लढता आले, याचा मला आनंद आहे.”
“आज, भारताकडे अनेक ‘मेड इन इंडिया’ लसी आहेत. योग्य मुल्यमापन करुन आपण इतर लसींनाही मंजुरी दिली आहे. आम्ही आता या महामारीविरोधात लढण्यासाठी सुस्थितीत आहोत. तसेच आपल्याला कोविड संबंधित खबरदारीच्या उपाययोजनांचे नियमित पालन करत राहावे लागणार आहे.”