पुणे – माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा तथा आर एम धारीवाल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या 82 व्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आर एम डी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन, बालन ग्रुप, तथा ईंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, किशोर जैन (शास्त्रज्ञ )यू एस ए ,विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, अनेक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, उदयोग जगतातील मान्यवर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, लोणी धामणी गावचे सरपंच व प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. यावेळी विशाल ताजनेकर यांनी रसिकलाल धारिवाल यांचे भव्य तैलचित्र शोभा धारिवाल यांना भेट दिले.
यावेळी बोलतांना शोभा धारिवाल म्हणाल्या कि, रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त आर एम डी फाऊंडेशनच्या माध्यमातून 2014 साली महारक्तदान सोहळ्याचे आयोजन संपूर्ण राज्यात ओळखल्या गेले. एकाच दिवशी पुणे शहरात 24 हजार रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या होत्या. दोन वर्षांपासूनच्या कोरोना काळात आर. एम. डी. फाऊंडेशनच्या फिरती वातानुकूलित व्हॉल्वो बसच्या माध्यमातून वर्षभर अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं आयोजित करून रक्तसाठा गरजेच्या वेळी गरजवंतांना उपलब्ध करून दिला. तसेच आर एम डी फाऊंडेशनची हि व्हॉल्वो वातानुकूलित बस कोणत्याही मंडळास, कार्यक्रमास अथवा गावात संपूर्ण तांत्रिक चमूसहित रक्तदान शिबिरास मोफत उपलब्ध करून दिली जात असल्याचे व त्याचा फायदा रक्तदान शिबिरं आयोजित करतेवेळी जरूर घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी रक्तदाते स्वईच्छेने आले होते. यावेळी 250 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सकाळी 8 वाजल्यापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर सुरु होते. सर्व रक्तदात्यांचे शोभा धारीवाल यांनी आभार मानले .