हडपसर(प्रतिनिधी) – शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे हे प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी व प्रभागाच्या विकासासाठी कायमच प्रयत्नशील असतात. या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी गेली काही महिन्यापासून नगरसेवक नाना भानगिरे यांनी महापालिका व पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काम अंतिम टप्प्यात असून त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. त्यामुळे नवीन प्रभाग क्रमांक 44 व 46 मधील नागरिकांना लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे.
रामटेकडी येथून सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीत पाणी नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाण्याच्या लाईनच्या कामाची पाहणी आज नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी केली. यावेळी महापालिका पाणी पुरवठा अधिकारी अनिरुद्ध पावसकर, लष्कर पाणी पुरवठा अधिकारी सुभाष पावरा उपस्थित होते. नगरसेवक भानगिरे व अधिकारी यांनी कामाची पाहणी करून योग्य त्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. कामाची गती अशीच राहिल्यास या प्रकल्पातून एक – दिड महिन्यात पाणी पुरवठा सुरू होईल,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक नाना भानगिरे म्हणाले की, सुरवातीला ठेकेदार व नंतर पुरेशा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे हा प्रकल्प काही काळ रखडला होता. या भागाचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाना तुम्हीं प्रयत्न कारावा, अशी येथील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार नागरिकांच्या समवेत लष्कर पाणी पुरवठा विभाग, महापालिका प्रशासन येथे आंदोलने केली. महापालिका अधिकारी यांच्या समवेत बैठका घेतल्या. वाढीव निधीसाठीही पाठपुरावा केला .याशिवाय काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी मी स्वतः रात्री उशिरापर्यंत थाबून पाण्याच्या लाईनचे काम करून घेतले आहे. आता रामटेकडी येथे काम सुरू आहे. लवकरच तेही काम पूर्ण होईल.
“रामटेकडी येथे वन विभागाच्या जागेत आठ- दहा झाडांचा अडथळा निर्माण होत असल्याने पाण्याची लाईन जोडण्यासाठी विलंब होत होता. त्यासाठी आवश्यक त्या कागद पत्रांची पूर्तता करून येथून लाईन टाकण्यास परवानगी मिळालेली आहे. झाडांचे पुनर्ररोपण करण्यात येत आहे. लाईन जोडण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे.लवकरच काम पूर्ण होईल. येथून सेलेना पार्क येथील पाण्याचा टाकीत पाणी गेल्यानंतर नागरिकांना पाणी पुरवठा होईल तेव्हाच मी स्वस्थ बसेल.”
– प्रमोदनाना भानगिरे (नगरसेवक, शिवसेना)
सलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीत पाणी आल्यानंतर काळेपडळ व हांडेवाडी रोड या भागातील सुभाष पार्क, जैन टाऊनशिप, इशा एम्पायर, इताशा, गिनी संस्कृती, रुणवाल, गंगा व्हिलेज, 5th अवेन्यू, सिद्धिविनायक विहार, सनराइज, अथर्व ईसीपी वास्तू नमो विहार, अशोका नगर, नीलेश क्लासिक, आशियाना, ड्रीम्सओनीला, ड्रीम्स एलेगन्स,ड्रीम्स एलिना, ड्रीम्स सोलेस, ड्रीम्स आकृती, कोहिनूर, ड्रिम्स इस्टेट, सुयश पार्क, कुमार पेबल पार्क ,समृद्धी, नवरत्न एक्झोटीका, फिलोसिया, मयूर जेमिनी, राहुल ईस्ट व्हा,ऑर्चर्ड, डायनॅमिक, रतन हौसिंग,आयरीन, यशराज प्रिमो, नीलेश समृद्धी, ग्रीन सिटी, मंत्रा मेमोरीज ,फ्लोरिस्टा काउंटी, रवी पार्क, ईस्ट,एआरव्ही रॉयल या गृहरचना सोसायट्या व चिंतामणी नगर, सय्यद नगर, गुलामाली नगर, उद्योग नगर, सातव नगर, संतोष नगर, इंदिरानगर, दुगड चाळ आणि परिसरातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळणार आहे. असेही नगरसेवक नाना भानगिरे यांनी सांगितले.