युक्रेनवर रशियाच्या लष्करी हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नागरिकांना शस्त्र हाती घेण्याचे आवाहन केले आहे. यानंतर माजी हेवीवेट चॅम्पियन विटाली क्लिट्स्कोनेही रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या युद्धात त्याचा भाऊ व्लादिमीर क्लिटस्को देखील त्याच्यासोबत असेल. हे दोघेही दिग्गज बॉक्सर राहिले आहेत आणि आता रणांगणावर रशियन सैन्याविरुद्ध भूमिका घेण्यास सज्ज आहेत.
2014 पासून कीवचे महापौर आहेत विटाली
विटाली हे २०17 पासून युक्रेनची राजधानी कीवचे महापौर आहेत. आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसून ते लढण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 50 वर्षीय विटाली हे डॉ. आयर्नफिस्ट म्हणून ओळखले जात होते. युक्रेनवर आणि युक्रेनच्या लोकांवर आपला विश्वास असल्याचे यावळी त्यांनी सांगितले.
Wladimir Klitschko and Vitali Klitschko launch a joint video appeal after Vladimir Putin launched an invasion of Ukraine by Russia…
[📽️ @Vitaliy_Klychko & @Klitschko] pic.twitter.com/uVG4NqtCff
— Michael Benson (@MichaelBensonn) February 24, 2022
कोण आहे विटाली क्लिट्स्को?
विटालीने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या लढाया जिंकल्या आहेत.1999 ते 2000 दरम्यान त्यांनी WHO चे विजेतेपद पटकावले. त्याच वेळी, 2004 ते 2005 दरम्यान, त्यांच्याकडे द रिंग मॅगझिनचे शीर्षक होते. याशिवाय हेवीवेट लढतीत 15 हून अधिक प्रतिस्पर्ध्यांचा पराभव त्याने केला तसेच 12 वेळा त्याने आपल्या विजेतेपदाचे यशस्वीपणे रक्षण केले होते. 2011 मध्ये, विटाली आणि व्लादिमीर यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले होते. त्यादरम्यान दोघांनी मिळून सर्वाधिक 30 हेवीवेट लढती जिंकल्या होत्या. 2020 पर्यंत ही संख्या 40 वर पोहोचली होती.