जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या कारला शुक्रवारी सकाळी वाराणसीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. सिन्हा वाराणसीहून त्यांच्या मूळ गावी गाझीपूरला जात होते. त्यांची कार राजघाट पुलाच्या (मालवीय पूल) उतारावर लावलेल्या लोखंडी खांबावर आदळली.
लोखंडी खांबाच्या मधोमध वाहन बाहेर काढण्याताना कार डाव्या बाजूचे धडकली. यामध्ये कारचे नुकसान झाले. कारचे एक चाकही पंक्चर झाले. जवळच तैनात असलेले पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सीओ अनिल राय, मुगलसराय इन्स्पेक्टर ब्रिजेश तिवारीही घटनास्थळी पोहोचले.
उप राज्यपाल यांना दुसऱ्या गाडीत बसवून इच्छितस्थळी पाठवण्यात आले. यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रामनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अश्विनी पांडे यांनी सांगितले की, अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.