सातारा- सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी शबनम मुजावर यांची नियुक्ती झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
तात्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांची बदली झाल्यानंतर हे पद काही महिने रिक्त होते. मात्र तात्पुरता कार्यभार उपशिक्षणाधिकारी धनजंय चोपडे यांच्याकडे होता. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर चांगले कामकाज केले. कराड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. याबाबतचा आदेश शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे उपसचिव टिकाराम करपते यांनी काढला आहे.
शबनम मुजावर यांनी यापुर्वी 11 वर्षे शिक्षीका म्हणून काम केले.त्यानंतर प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे मुख्याध्यापिका, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सातारा येथे काम केले आहे. संसाराचा गाडा चालवत त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे.
निवडीनंतर शबनम मुजावर म्हणाल्या, राजधानीत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणखी सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. प्राथमिक शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर राहणार आहे. सातारा जिल्ह्याला साजेसे काम करणार आहे.