मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केले जातेय. प्रकाश आंबेडकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. प्रकाश आंबेडकर यांनी शिवरायांना वंदन करत एक फोटो ट्वीट करून ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असे म्हंटले आहे.
प्रकाश आंबेडकर ट्विटमध्ये म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. “जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे.
"जय भवानी" ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.
१/३ pic.twitter.com/xw3mugLF1s
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 19, 2022
परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्यावेळी शिवाजी महाराज, म.फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. महाड सत्याग्रहाच्यावेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती.