मुंबई,- एनसीबीने माजी एनसीबी अधिककारी समीर वानखेडे यांची काल तब्बल 23 तास चौकशी केली. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता वानखेडेंचा पाय खोलात घुसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. या चौकशीत एनसीबीच्या हाती काही लागले किंवा नाही. याची मात्र स्पष्ट महिती अद्याप मिळू शकलेली नाही.
येत्या मार्चमध्ये या चौकशीचा अंतिम अहवाल सादर होणार आहे. देशातल्या हायप्रोफाइल केसेपैकी एक आर्यन खान ड्रग्ज प्रकरण अत्यंत वादग्रस्त ठरले. शाहरुख खानच्या मुलाला अटक झाल्याने देशात खळबळ माजाली होती. यानंतर वानखेडे यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले. मात्र ही कारवाई पूर्णपणे कायद्याचे पालन करून करण्यात आल्याचे वानखेडे यांच्याकडून सांगण्यात आले.
वानखेडे यांची आता कसून चौकशी केल्यानंतर काही महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांनी या चौकशीदरम्यान काही महत्वाची कागदपत्रे एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांना सादर केल्याचेही बोलले जात आहे. या कागदपत्रातून काय बाहेर येतंय हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या चौकशीदरम्यान आर्यन खानच्या मेडीकलबाबतही समीर वानखेडेंना विचारणा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. फक्त मेडीकलच नाही तर आर्यन खानला जे फोन उपलब्ध करून दिले, त्याबाबतही वानखेडेंना स्पष्टीकरण मागितल्याची माहिती समोर आली आहे.