नेहमीच घाईत असणाऱ्या तरुण सहस्रकांच्या आरोग्य आणि स्वास्थ्याशी संबंधित आवश्यक गरजा
भागविण्यासाठी चवदार, कालानुरुप, सोयीस्कर आणि सुलभ पोषण पूरक आहार
मुंबई : देशातील अग्रगण्य एफ.एम.सी.जी डायरेक्ट सेलिंग कंपन्यांपैकी एक असलेली
ॲमवे इंडिया, स्वास्थ्य आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या विभागातील उत्पादनांमध्ये सतत नाविन्य आणत
आपले नेतृत्व मजबूत करणे सुरू ठेवून त्याच्या मुख्य ब्रँड न्यूट्रिलाईट अंतर्गत पहिल्यांदाच, पोषण पूरक
आहारांची श्रेणी सादर करत आहे, जी कालानुरूप, चवदार, सोयीस्कर आणि सुलभ स्वरूपाची आहे, जसे की चवदार गमीज आणि तोंडात विरघळणाऱ्या जेली स्ट्रिप्स. ही श्रेणी एकूण आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती,
हाडांचे आणि डोळ्यांचे आरोग्य यांसाठी आवश्यक पोषक तत्वांनी भरलेली आहे. आधुनिक जीवनशैलीसाठी, खासकरून व्यस्त तरुण सहस्रकांच्या सोयीप्रमाणे रचलेली, ॲमवेच्या पोषण पोर्टफोलिओला आणखी बळकट करण्यासाठी ही सोयीस्कर पोषण पूरक आहारांची श्रेणी तयार आहे.
आज सहस्रक लोकांची व्यस्त जीवनशैली समजून घेत, अॅमवेने त्यांच्या दैनंदिन पोषणविषयीच्या गरजा
भागविण्यासाठी सोयीस्कर पौष्टिक उपायांचे सूत्रीकरण केले आहे. सध्या, या श्रेणीमध्ये तीन उत्पादनांचा
समावेश आहे – एकूणच आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यासाठी जीवनसत्त्वं आणि
खनिजं असलेल्या स्ट्रॉबेरी स्वादात गमीज – सीझ द डे, हाडांच्या आरोग्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीला
आधार देण्यासाठी व्हिटॅमिन डी३ असलेल्या तोंडात विरघळणाऱ्या जेली स्ट्रीप्स – डी-फेंस आणि डोळ्याच्या
आरोग्याला आधार देण्यासाठी ल्युटीन आणि झेॲक्सॅन्थिन असलेल्या आय कँडी गमीज.
लाँच करण्याची घोषणा करताना, अंशु बुधराजा, मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲमवे इंडिया म्हणाले, या
नवीन श्रेणीचे न्यूट्रिलाईट अंतर्गत लाँच करणे हा या ब्रँडच्या नवनिर्मितील एक निर्णायक क्षण आहे.
पौष्टिकतेच्या या मजेदार आणि सोयीस्कर स्वरूपांसह आरोग्यपूर्ण जीवन टिकवून ठेवण्यासाठी पूरक
आहारांचा वापर वाढविण्याचे आमचे उद्दीष्ट आहे, जे आपल्या पोषणविषयीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी
डिझाइन केलेले आहे. सध्या, तरुण लोकं जास्त करून घरातच वेळ घालवत आहेत आणि म्हणून ते
अंगावर कमी सूर्यप्रकाश घेतात व त्यामुळे त्यांच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते आणि विविध
डिजिटल उपकरणांच्या माध्यमातून निळ्या प्रकाशाच्या किरणोत्सर्गाच्या संपर्कात जास्त वेळ येत असताना,
एकूण आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासह, हाडांचे व डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्याच्या
गरजेकडे लक्ष देणे तितकेच महत्वपूर्ण आहे. ही गरज समजून घेत, आम्ही आतापर्यंत लक्ष्यित
परिस्थितींमध्ये फायदा करून देण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांनी भरलेल्या गमीज आणि जेली स्ट्रिप्स सादर केल्या आहेत. ही श्रेणी विशेषत: नेहमीच घाईत असलेल्या तरुण सहस्रकांच्या आजच्या वेगवान जीवनशैलीला पूरक म्हणून डिझाइन केलेली आहे. आवडीप्रमाणे तयार केलेल्या आणि सुलभ पोषण विभागावर, विशेषत: तरुणांसाठीच्या, आमचे लक्ष केंद्रित करण्यास चालना देताना, आम्हाला अपेक्षा आहे की ही नवीन श्रेणी त्यांच्या अपेक्षा आणि दररोजच्या पोषणविषयीच्या गरजा पूर्ण करेल आणि आमच्या एकूण पोषण श्रेणीला त्यामुळे महत्त्वपूर्ण योगदान देईल.
उत्पादनाची गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेवर मोठी पैज लावणे हे त्याच्या प्रमुख विकास चालकांपैकी एक
म्हणून, ॲमवे इंडिया आपल्या पोषण पोर्टफोलिओमधून भिन्न उत्पादनं उपलब्ध करून देण्यावर लक्ष
केंद्रित करत आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीप्रमाणे, कोणतीही हानिकारक समावेशी आणि रक्षके नसलेली ही नाविन्यपूर्ण स्वरूपातील पूरक आहारांची नवीन श्रेणी एक नवीन भर आहे.
या लाँच विषयी बोलताना, श्री. अजय खन्ना, सी.एम.ओ, ॲमवे इंडिया म्हणाले की, आमच्या मुख्य ब्रँडन्यूट्रिलाईट समर्थित ॲमवेकडून मस्त, कालानुरूप आणि सुलभ पोषण म्हणून या नाविन्यपूर्ण स्वरूपातील पूरक आहारांची आमची नवीनतम उपलब्धी नवीन पिढीच्या ग्राहकांच्या पोषणविषयीच्या गरजा भागविण्यासाठी उत्तम प्रकारे परिभाषित केली गेली आहे. हल्लीच्या अहवालांप्रमाणे, ४८% 1 ग्राहक चवीच्या कमतरतेमुळे पूरक आहाराचे सेवन करत नाहीत आणि संभाव्य प्रेक्षकांपैकी ७३% 2 संभाव्य प्रेक्षक गमीज ना योग्य स्वरूप मानण्याचा विचार करत आहेत.
याला व्यस्त जीवनशैली, वाढते विनियोज्य उत्पन्न आणि प्रतिबंधात्मक उपायांवर अधिक लक्ष केंद्रित करणे यांसारख्या घटकांद्वारे प्रोत्साहन मिळाले आहे. तसेच, पोषण विषयीच्या गरजा भागविण्यासाठी त्यांचा नियमित आहार पुरेसा नसतो, याबद्दल आजच्या तरुणांना चांगली माहिती, जागरूकता आणि जाणीव आहे. हे पौष्टिक पूरक आहाराची त्यांच्यात आवड वाढवत आहे. परंतु ते नेहमीच घाईत असतात आणि अशा प्रकारचे स्वरूप शोधतात जे प्रभावी तर आहेतच, पण वापरण्यास सुलभ आणि चवदार आहेत व जे व्यत्यय न आणता त्यांच्या नित्य वापरात चपखलपणे बसतात. म्हणूनच, न्यूट्रिलाईटकडून गमीज आणि जेली स्ट्रिप्स स्वरूपातील ही पूरक आहारांची नवीन श्रेणी सोयीस्कर, चवदार आणि सुलभ पोषणाच्या वाढत्या मागणीकडे लक्ष देण्याचा सर्वात आशादायक मार्ग आहे.
आधुनिक जीवनशैलीच्या आरोग्य आणि स्वास्थ्यविषयीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पूरक आहार
तयार केले गेले आहेत. ते पुढे असं म्हणाले की, न्यूट्रिलाईटने, ८० वर्षांहून अधिक काळ पुरवण्यासाठी वनस्पती-आधारित दृष्टीकोनाचे समर्थन केले आहे, जे उत्पादनाच्या कार्यक्षमतेत भर घालणाऱ्या उच्च पातळीची शुद्धता, सुरक्षितता आणि सामर्थ्य प्रदान करत आहे आणि हे उत्पादनातील मुख्य फरक दर्शवितं व बाजारातील त्याचा मजबूत वारसा आणि इक्विटीमुळे, आम्हाला विश्वास आहे की आमची नाविन्यपूर्ण उपलब्धी आमच्या आधुनिक ग्राहकांच्या विकसनशील गरजा निश्चितच पूर्ण करेल.
ॲमवे इंडिया, जे लोकांना अधिक चांगले, आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे,
जीवनसत्त्वं आणि आहारातील पूरक यांची विक्री करणारा जगातील नंबर १ ब्रँड न्यूट्रिलाईट अंतर्गत,
सातत्यपूर्ण उत्पादनातील नाविन्य आणि अद्वितीय बियाणे-ते-पूरक उत्पादन विकासाद्वारे आरोग्य आणि
रोगप्रतिकारक शक्ती विभागात आपले पाय मजबूत करत आहे. ॲमवेच्या वैज्ञानिक संशोधनाच्या मजबूत
वारशाचा पाठिंबा सर्व न्यूट्रिलाईट उत्पादनांना मिळालेला आहे, ज्यामुळे ते एखाद्याचे आरोग्य टिकवून
ठेवण्याचा एक प्रभावी मार्ग बनतात.
सीझ द डे मल्टीविटामिन आणि खनिज गमीज, डी-फेंस व्हिटॅमिन डी३ जेली स्ट्रिप्स आणि आय कँडी
ल्युटीन आणि झेॲक्सॅन्थिन गमीज हे ६० गमीज किंवा जेली स्ट्रिप्सच्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत आणि
रुपये ७९९, रुपये ६३० आणि रुपये ६२९ अशी त्यांची अनुक्रमे किंमत आहे. हे केवळ भारतभरातील ॲमवे
डायरेक्ट सेलर्स/रिटेलर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी, कंपनीच्या www.amway.in
या वेबसाइटला भेट द्या.