बेंगळुरू – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याशी प्रसिद्ध कोकाकोला कंपनीने तब्बल 15 कोटींचा करार केला आहे. कोका कोलाने आपल्या ग्लोबल स्पोर्टस ड्रिंकच्या जाहिरातीसाठी धोनीला आगामी तीन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे.
दरम्यान, धोनी कोकाकोलासह 30 पेक्षा जास्त ब्रॅंड्सशी करारबद्ध आहे. 2016 साली कोका कोलाच्या पेप्सिको आणि धोनी यांच्यातील 11 वर्षांचा करार संपुष्टात आला होता. यादरम्यान त्याने पेप्सी कोला आणि लेज चिप्सचेही ब्रॅंड प्रमोशन केले होते.