तिरुवनंतपुरम – देशात कोरोनाची तिसरी लाट येत आहे. अश्यात काही राज्यांनी निर्बंध, लॉकडाउन लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान केरळात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झालीये. वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन एकदिवसीय आहे. म्हणजेच रविवारपुरताच मर्यादित आहे. सरकारने लॉकडाऊनमधून फक्त अत्यावश्यक सेवांनाच सूट दिली आहे.
कोरोनाचा स्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी उच्च स्तरिय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत 23 आणि 30 जानेवारीला फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. तसेच एकदिवसीय लॉकडाऊनच्या दिवशी म्हणजेच रविवारी किराणा दुकानं आणि बाजारपेठांना सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंतच मुभा देण्यात आली.
केरळात कोरोनाचा कहर
केरळात शनिवारी 45 हजार 136 कोरोनाबाधितांची नोंज करण्यात आली. त्यामुळे केरळातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा का 55 लाख 74 हजार 702 वर जाऊन पोहचला आहे.