नागपूर – “डान्स हंगामा’ या नावाने नृत्य कार्यक्रमाचे बंद तंबूत आयोजन करून तेथे अश्लील नृत्य्यय केली जात असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार तेथील नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण्यात आला. यात नृत्य करणाऱ्या तरूणी कोणत्या आहेत अयाची सखोल चौकशी करण्याची मागण हिोत आहे.
उमरेडमधील बामणी आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये डान्स हंगामा नावाने कार्यक्रमाच्या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करीत होता. बामणी या गावात डान्स हंगाम कार्यक्रमासाठी पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नव्हती. अश्लील नृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत अशी माहिती उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांनी दिली आहे.
विशेष तपास पथक स्थापन
ब्राम्हणी येथील अश्लील नृत्य कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलीस उपाधीक्षक पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणाचीही हयगय करण्यात येणार नाही अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली आहे.