मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात ह्रदय विकाराच्या झटक्यानंतर निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांनी देखील सिंधुताई यांच्या सामाजिक कामाचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे.
अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 4, 2022
शरद पवार म्हणाले, “ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”