जम्मू-काश्मीरमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला माता वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. याशिवाय 20 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. कटरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रातील ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. गोपाल दत्त यांनी सांगितले की, या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
Extremely saddened by the loss of lives due to a stampede at Mata Vaishno Devi Bhawan. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Spoke to JK LG Shri @manojsinha_ Ji, Ministers Shri @DrJitendraSingh Ji, @nityanandraibjp Ji and took stock of the situation.
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2022
जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. गोपाल यांनी दिली आहे.
#UPDATE: 12 dead, 13 injured in the stampede at Mata Vaishno Devi Bhawan in Katra. The incident occurred around 2:45 am, and as per initial reports, an argument broke out which resulted in people pushing each other, followed by stampede: J&K DGP Dilbagh Singh to ANI
(file photo) pic.twitter.com/EjiffBTMaJ
— ANI (@ANI) January 1, 2022
काल रात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर यात्रा थांबवण्यात आली आहे. या घटनेनंतर अनेक भाविकांनी घरी परतण्याचा मार्ग पत्करला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला आहे. आपल्या संदेशात, पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या यात्रेकरूंच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर, जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.