अथेन्स – ग्रीसमधील दक्षिणेकडील क्रेटा बेटाला आज भूकंपाचे दोन धक्के बसले. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 5.2 आणि 5.4 इतकी होती. मात्र या दोन्ही धक्क्यांमध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. यापैकी पहिला धक्का संध्याकाळी सव्वा पाच वाजता बसला आणि त्याची तीव्रता 5.2 इतकी होती.
क्रेटा बेटाच्या पूर्वेकडील भागाला हा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली 9 किलोमीटरवर होता. त्यापेक्षाही अधिक जास्त क्षमतेचा भूकंप 9 वाजण्याच्या सुमारास बसला. त्याची क्षमता 5.4 होती. तर त्याचा केंद्रबिंदू पहिल्या भूकंपाच्या केंद्रबिंदूच्या वायव्येला 25 किलोमीटरवर जमिनीखाली 6.3 किलोमीटरवर होता, असे इन्स्टिट्युट ऑफ जिओडायनामिक्सने म्टले आहे. या भूकंपात कोणत्याही इमारतीचे नुकसान झाले नाही, असे जवळच्या कसोस शहराच्या महापौरांनी म्हटले आहे.
या दोन प्रमुख भूकंपाच्या धक्क्यांव्यतिरिक्त 4.0 क्षमतेचा आणखीन एक धक्का अथेन्स शहराच्या पश्चिमेला संध्याकाळी सव्वा 6 वाजता जाणवला होता. ग्रीसमध्ये भूकंपाचे धक्के जाणवणे ही काही नवीन गोष्ट नाही. एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्केही जाणवले जाऊ शकतात. मात्र पहिल्यापेक्षाही दुसरा धक्का अधिक मोठा असण्याची गोष्ट नवीन आहे.