नुसरत भरुचा सध्या “छोरी’ या आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीत अडकली आहे. अलीकडेच या सिनेमाचा एक टीजर रिलीज झाला आहे. या सिनेमात नुसरत एका प्रेग्नंट महिलेच्या रोलमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
प्रेग्नंट महिला दिसण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यायला लागले आहेत. शूटिंगपूर्वी तिला मापासाठी प्रेग्नंट बॉडी सूट घालायला दिला गेला होता. नुसरतला या बॉडी सूटमध्ये वावरण्याची सवय करायची होती.
View this post on Instagram
म्हणून तिने शूटिंगच्या 25 दिवस अगोदरपासून हा प्रेग्नंट बॉडी सूट वापरायला सुरुवात केली. नुसरतला प्रेग्नंट दिसण्यासाठी एवढा आटापिटा करावा लागला. कारण तिला आतापर्यंत प्रेग्नंट होण्याचा अनुभव मिळालेला नाही. प्रत्यक्षात इतक्यात हा अनुभव मिळण्याची शक्यताही नाही.
View this post on Instagram
त्यामुळे स्क्रिनवर कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी तिचा हा आटापिटा चालला आहे. प्रेग्नंट बॉडी सूट वापरण्याने प्रेग्नंट महिलांना कोणत्या स्थितीतून वावरावे लागते हेदेखील समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे.
View this post on Instagram
“छोरी’हा एक हॉरर सिनेमा आहे. एका गावाच्या एका कोपऱ्यात घडणाऱ्या काही असामान्य घटनांपासून या सिनेमाची कथा सुरू होते. “छोरी’ 28 नोव्हेंबरला अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.