मुंबई – ‘पवारसाहेब जे म्हणाले ती चिड, संताप आणि वेदना आहे.भाजप सत्तेसाठी काही करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. पवार कुटुंब ,आम्ही सगळे,भुजबळ यांना जेल मध्ये जावं लागलं याची भरपाई कोण करणार, प्रत्येक पापाची किंमत चुकवावी लागेल, परमबीर सिंग यांनी आरोप केले ते कसे पळून गेले. केंदीय यंत्रणांनी त्यांना पळवून लावले का?’ असा , अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला आहे. पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झालेल्या अटकेबाबत भाष्य केले आहे. देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. असा निशाणा पवार यांनी भाजपवर लगावला आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी शरद पवारांचे विधान चीड, संताप व वेदनेतून आले असून, भाजपला याची किंमत चुकवावी लागेल, अशा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.