अमरावती – त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले होते. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. मात्र त्याला हिंसक वळण लागलं होतं. आता या प्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. अटक केलेल्यांमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांचाही समावेश आहे.
अमरावतीत काही दुकानांना आग लावण्यात आली. सर्वाधिक उपद्रव राजकमल चौक, नमुना परिसरात झाला. रविवारी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. शिवाय तीन ते चार दिवसांसाठी इंटरनेटसेवा देखील बंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास 90 जणांना अटक केआली आहे. यामध्ये भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह महापौर चेतन गावंडे आणि भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय यांचाही समावेश आहे. त्यामुळे या हिंसेमागे भाजपच होत का, असा प्रश्न उपस्थित होतोय.