पुणे – शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती प्रदान प्रसंगी नृत्य व अभिनयाबरोबर च क्रीडा क्षेत्रातील ( जिमन्यास्टिक ) उल्लेखनीय कामगिरी बद्दल साहिल पांडुरंग मरगजे, गिर्यारोहक स्मिता घुगे, भिषेकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या डॉकटर्स फॉर बेगर्स या संस्थेचे अध्यक्ष डॉ अभिजित सोनवणे आणि आय पी एस अधिकारी ओंकार पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे संपन्न झाले ल्या या कार्यक्रमात शंभर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली, तर महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मासुम या संस्थेस शिवसह्याद्री आधारवड पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ सुहास दिवसे, मिटकॉन फाउंडेशन चे विश्वस्त व चेअरमन डॉ. प्रदीप बावडेकर, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अध्यक्ष राजेंद्र कोंढरे उपस्थित होते.
फाउंडेशनचे अध्यक्ष कोंढरे यांनी प्रास्ताविक पर भाषणात सांगितले की, संस्थेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या व्याजातून शिष्यवृत्ती दिली जाते, आतापर्यंत ६५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. नितीन साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.