बेंगळुरू – पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत नवनवे खेळाडू दाखल होणार असून प्रशिक्षकही बदलले जात आहेत. रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्याशी करार केला आहे.
भारतीय संघाशी असलेला बांगर यांचा करार संपल्यामुळे त्यांनी बेंगळुरूचा प्रस्ताव स्वीकारला आहे. पुढील वर्षीपासून या स्पर्धेत दोन नवे संघ दाखल होत आहेत. बांगर यांचा करार आगामी दोन वर्षांसाठी असेल.